कोंढव्यात टोळक्‍याने कोयत्याने हल्ला केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुन्या वादातून टोळक्‍याने तरुणावर कोयत्याने वार करून जखमी केलेल्या तरुणाचा गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्तिक जाधव (वय 22, रा. कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक जाधव कोंढव्यातील रहिवासी असून त्याच्यावर यापुर्वीच एका व्यक्तीच्या खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याची यापुर्वी काही तरुणांशी भांडणे झाली होती. कार्तिक गुरूवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास येवलेवाडी परिसरात आला होता. त्यावेळी टोळक्‍याने त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाल्याने उपचाराठी त्याला तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी सुरुवातील खुनाचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. आता त्याचा मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा करण्यात आला आहे.