
कर्ज फेडण्यासाठी गारमेंट व्यावसायिकाच्या घरी 35 लाखांची घरपह्डी करणाऱया तिघांना कुरार पोलिसांनी राजस्थान आणि नवी मुंबई येथून अटक केली. उमेश देवासी, जगू देवासी आणि राजू देवासी अशी त्या तिघांची नावे आहेत. तर मुख्य आरोपी हा पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याने जेलमधून सुटल्यावर फरार आरोपीने तिघांना हाताशी धरून घरपह्डीचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.
व्यावसायिकाच्या तक्रारदार हे गारमेंट व्यावसायिक असून ते कुरार पोलीस ठाण्याच्या परिसरात राहतात. काही कारणास्तव तक्रारदार याने घरी 35 लाख रुपयांचे दागिने आणून ठेवले होते. 13 दिवसांपूर्वी तक्रारदार यांची पत्नी भाजी आणण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. तेव्हा जगू, उमेश, राजू हे तेथे आले. जगूने घरपह्डी करून घरातून 35 लाखांचा ऐवज चोरून पळ काढला. महिला घरी आल्यावर तिच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. तिने याची माहिती कुरार पोलिसांना दिली. कुरार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. अतिरिक्त आयुक्त प्रवीण पडवळ यांनी तपासाच्या सूचना दिल्या. परिमंडळ-12 चे उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सतीश गाढवे, पोलीस निरीक्षक मनोज चाळके, उपनिरीक्षक सतीश भालेराव, रोहित जाधव, भोगले, वेदांतें, मांडवे, तांबोळी, सकट, धडसी आदींनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर घटनास्थळी पोलिसाना एक छिन्नी आढळून आली. त्यावरून तपासाची चव्रे फिरली. ती छिन्नी अंधेरी येथून विकत घेतल्याचे समजताच पोलीस तेथे गेले. छिन्नी विकत घेणाऱयाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सुरुवातीला राजूला त्यानंतर उमेशला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत जगूचे नाव समोर आले. त्यालादेखील राजस्थान येथून अटक केली. चौकशीत त्या तिघांनी घरपह्डी केल्याचे पोलिसांना सांगितले. घरपह्डी त्यानंतर ते तिघे मालाड येथे गेले. मालाड येथून सुरतला गेल्यावर त्या तिघांनी 35 लाखांचे दागिने फरार आरोपीला दिले. फरार आरोपीने सुरत येथे एका ज्वेलर्सला काही दागिने विकून त्या तिघांना सव्वा लाख रुपये दिले. त्यानंतर मुख्य आरोपी हा पळून गेला आहे.

























































