
ओंकार भागानगरे खून प्रकरणात पोलिसांनी तीन संशयीत आरोपींना अटक केली आहे. सध्या त्या तिघांची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणातील तीन मुख्य आरोपी मात्र अद्याप पर्यंत फरार आहे. दरम्यान लवकरच आरोपींचा शोध लागेल असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी व्यक्त केला. वैभव हुचे, रवी नामदे, सागर गुडा अशा अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत
दोन दिवसांपूर्वी ओंकार भागानगरे याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर तीन ठिकाणी विविध पथके पोलिसांची शोधासाठी पाठवलेली होती दोन दिवसानंतर पोलिसांच्या हाती जी माहिती लागली आहे त्यामध्ये वरील तीन आरोपी हे या प्रकरणातील फिर्यादी तसेच भागानगरे कुटुंबातील इतरांची माहिती हे संबंधित आरोपींना पुरवत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यांच्यावर या पोलीस पथकाने पाळत ठेवलेली होती. बुधवारी रात्रीच्या सुमारास या तिघांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणांमध्ये अन्य महत्त्वाचे तीन आरोपी मात्र अद्याप पर्यंत फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे लवकरच त्यांचा शोध लागेल अशी ग्वाही अधीक्षक ओला यांनी दिली.


























































