रत्नागिरीत वीज पडून तीन जनावरे ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

वीजांचा चमचमाट आणि ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपले. संगमेश्वर तालुक्यांतील वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू झाला. रत्नागिरी नगर परिषदेच्या आवारात झाड पडून दोन टेम्पोचे नुकसान झाले.

रत्नागिरी नगर परिषदेच्या मागिल बाजूस असलेल्या आंब्याची फांदी कोसळून नगर परिषदेच्याच दोन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास वादळी वारा सुरु झाला. त्यानंतर मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु झाली. रात्री अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेच्या मागील बाजूस असणाऱ्या जुनाट आंब्यांच्या झाडाची मोठी अवाढव्य फांदी नगर परिषदेच्या दोन टेम्पो ट्रक वर कोसळली. त्यामुळे या दोन गाड्यांचे मोठे नोकसान झाले. गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून या गाड्यांवर पडलेली आंब्याची फांदी बाजूला करण्याचे काम सुरु झाले. या कामी रत्नागिरी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यानी मेहनत घेतली. यावेळी झालेल्या घटनेची नगर परिषदेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली.

दरम्यान गुरुवार दिनांक 27 रोजी झालेल्या पर्जन्यवृष्टीमध्ये रत्नागिरी तालुक्यात 70 मिलिमीटर एवढा पाउस पडला. संपुर्ण जिल्ह्यामध्ये सरासरी 31. 78 मिलिमीटर एवढा पाऊस पडला. गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे व पर्जन्यवृष्टीमुळे रत्नागिरी व्यतिरीक्त संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी येथील मंगेश शंकर कांबळे यांच्या दोन बैल व एका गायीवर विज पडून ही दोन्ही जनावरे मृत झाली असून या शेत कऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.