नगरमध्ये आढळले कोरोनाचे तीन रुग्ण, रुग्णसंख्या 24 वर 

608

नगर जिल्ह्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 24वर पोहोचली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाने 31 जणांचे स्वॅब पुण्यात पाठवले होते. त्यापैकी ३ जण कोरोना पॉसिटिव्ह आढळले आहेत.  बाधित व्यक्तींपैकी 2 व्यक्ती या आलमगीर  येथील तर 1 व्यक्ती नगर शहरातील सर्जेपुरा भागातील रहिवासी आहेत. आलमगीर येथील बाधित व्यक्तीच्या संपर्कात या व्यक्ती आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

तीनही रुग्णांच्च्या संपर्कामध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांची तत्काळ तपासणी करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रवीण मुरबीकर यांनी दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या