मुंबईहून आलेल्या तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह, जालना जिल्ह्यात रुग्ण संख्या 44 वर

461

मुंबईहून दोन दिवसांपूर्वी जालन्यात आलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी दोन रुग्ण हे पती पत्नी आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या 44 वर पोहोचली आहे.

जालना तालुक्यातील वडगाव वखारी येथील मूळ रहिवाशी असलेले दोन भाऊ आणि या दोघांपैकी एकाची पत्नी असे तीन जण मुंबई येथे कामानिमित्त गेले होते. मुंबई येथून दोन दिवसांपूर्वी जालना येथे परतल्यानंतर हे तिघेही वखारी वडगाव येथे न जाता अंबड तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथे गेले. तिथे गेल्यानंतर तिघांनाही खोकला आणि ताप आल्याने हे तिघेही अंबड येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल झाले होते. अंबड येथून या तिघांना जालना येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा या तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येमुळे जिल्हावासियांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या