जालना जिल्ह्यातील टेंभुर्णीत तीन दिवस बंद; कोरोनााधित रुग्ण आढळला

जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने सुरक्षिततेसाठी संपूर्ण गाव तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत शनिवारपासून तीन दिवस बंदचे आदेश देण्यात आले आहेत.

शनिवारपासून तीन दिवस सर्व दुकाने, व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. या कळात संचारबंदीचे नियम पाळणे बंधनकाराक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचे आदेश तहसीलदार सोनी यांनी दिले आहेत. मास्क न वापरणाऱ्यांकडून एक हजाराचा दंड वसूल करण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या आदेशानुसार जाफ्राबादचे तहसीलदार सोनी, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, ग्रामविकास अधिकारी एस. डी. शेळके, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रकाश साबळे यांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्यात गावातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, पत्रकार यांची बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या