
पारनेर तालुक्यातील रूईछत्रपतीकडे जात असताना गुणोरे येथील जयसिंग बढे यांना हंगा नदीत तीन जण बुडत असल्याचे दिसले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदी उडी घेत बुडणाऱ्या तीन युवकांना वाचवले. बढे यांच्या या कामगिरीबाबत निघोज येथील शिवबा संघटना,प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने जयसिंग बढे यांचा सत्कार करण्यात आला.
बढे यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांना शासनाचा शौर्य पुरस्कार मिळावा म्हणून संघटनेकडून प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्यमंत्री बच्चू कडू व पारनेरचे आमदार निलेश लंके यांना शौर्य पुरस्कार मिळण्याबाबत शिफारस करण्याची विनंती करणार असल्याचे शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी सांगितले.





























































