Mumbai crime news – तिघे ड्रग्ज माफिया गजाआड

परराज्यातून मुंबई व उपनगरात विकण्यासाठी आणलेला चरसचा साठा मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने वेळीच पकडला. पोलिसांनी वडाळा, शिवडी, चार रस्ता परिसरात ड्रग्जची विक्री करणाऱ्या तिघा माफियांना पकडून तब्बल चार किलो 773 ग्रॅम चरस साठा पोलिसांनी जप्त केला आहे. वडाळा, शिवडी, चार रस्ता परिसरात काही ड्रग्ज माफिया अमली पदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वांद्रे युनिटला मिळाली. त्यानुसार पथकाने शोध मोहीम राबवून ड्रग्ज विकणाऱ्या तिघांना पकडले. त्या तिघांकडून चार किलो 773 ग्रॅम वजनाचा चरस, तीन मोबाईल असा तब्बल एक कोटी 43 लाख 19 हजार किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. जप्त केलेला चरस हा परराज्यातून तस्करी करून आणण्यात आला होता. तो शहर व उपनगरातील नशेबाजांना विकण्यात येणार होता अशी कबुली आरोपींनी दिली. या कारवाईमुळे नशेबाजांची गोची झाली असून ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहेत.