
मुंबई-पुणे महामार्गावरील अपघाताचे सत्र थांबतच नाही आहे. लोणावळ्याजवळ एका कारचा भीषण अपघात झाला. गुरुवारी सकाळी 8 वाजून 35 मिनिटांनी ही घटना घडली. या अपघातात मुंबई आयआयटीच्या तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. ओमकुमार बोरसे, श्रेयंश शर्मा आणि ले असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
तिघेही विद्यार्थी आपल्या अन् मित्रांसोबत लोणावळ्याला सहलीला गेले होते. तेथून परतत असताना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अतिवेगामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार उलटली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. ओमकार हा नाशिकचा, ले नागपूरचा आणि श्रेयांश हा राजस्थानचा रहिवासी असून तिघेही मुंबई आयआयटीमध्ये शिक्षण घेत होते.






























































