नरवण येथे तीन लाखाची दारू पकडली

334

विधानसभा निवडणूकीच्या पाश्वभुमीवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर अवैध मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ठिकठिकाणी तपासणी नाके व गस्ती मोहिम राबविण्यात येत आहे. गुहागर तालुक्यांतील मौजे नरवण गावचे हद्दीत नरवण भंडारवाडी येथे राहणाऱ्या प्रविण पांडुरंग जाधव यांच्या घराच्या मागील बंदिस्त पडवीत व घरासमोरील उभे असलेली टाटा कंपनीची टाटा इंडीका व्हिस्टा या चारचाकी वाहनात देशी-विदेशी मद्याचा व गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा ठेवला असल्याचे उत्पादन शुल्क विभागाला समजले. त्याच्या घरावर छापा टाकून त्याच्या घराच्या पडवीत व वाहनामध्ये गोवा बनावटीची विदेशी मद्य, देशी मद्य व बिअर असे एकुण 49 बॉक्स आढळले. या मुद्देमालाची किंमत 3,03912 रुपये आहे व वाहनाची किंमत 2,25000 रुपये आहे. असा एकूण 5,28912 माल जप्त करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या