अंत्यसंस्कारावेळी आगीचा भडका होऊन तिघे भाजले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कळमनुरी

हिंगोली तालुक्यातील चिंचोली महादेव येथे अंत्यविधी प्रसंगी अचानक पेट्रोलमुळे आगीचा भडका होऊन तीन जण गंभीररित्या भाजल्याची घटना शुक्रवारी घडली. जखमींना कळमनुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हिंगोली तालुक्यातील चिंचोली महादेव येथील धम्मपाल घोंगडे यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत आणण्यात आले होते. दुपारी 4 वाजेच्या सुमारास अंत्यविधीसाठी लावलेल्या मेणबत्तीवर पेट्रोल पडल्याने अचानक आगीचा भडका उडाला. यामध्ये तीन जणांच्या अंगावरील कपड्याने पेट घेतल्याने तिघेही गंभीर जखमी झाले. जखमीमध्ये चंद्रमुनी घोंगडे, त्र्यंबक ठोके, बालाजी वाढवे यांचा समावेश आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी कळमनुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.