पानसरे हत्येप्रकरणी आणखी तिघांना पहाटे अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सचिन अंदुरे या शार्प शूटरसह एकूण तीन जणांना आज मुंबई व पूणे येथून ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे खून खटल्यात अटक करण्यात आली. अंदुरे याला पुणे येथील जेलमधून तर अमित बद्दी आणि गणेश मिस्किन याला मुंबई येथील आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेण्यात आले. सकाळी अकरा वाजता तिघांना कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात आले. यामुळे या प्रकरणी आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या बारा झाली आहे. या आधी एसआयटीने शरद कळसकर याना संशयित म्हणून अटक केलेली आहे.