छत्तीसगढमध्ये एका महिलेसह दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । रायपूर

हिंदुस्थानच्या सीमाभागात छत्तीसगढमधील दंतेवाडा-सुकमा जिह्यात हिंदुस्थानच्या सीमेवर बुधवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण सशस्त्र चकमकीत एका महिलेसह दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ही चकमक बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गोंदेरास गावात घडली.

या मोहिमेत जिल्हा राखीव पोलीस आणि विशेष टास्क फोर्सच्या जवानांनी भाग घेतला होता, असे उपनिरीक्षक जनरल (नक्षलविरोधी) सुंदरराज यांनी पत्रकारांना सांगितले. पोलिसांच्या हाती केवळ महिला नक्षलवाद्याचा मृतदेह लागला आहे. दुसऱया नक्षलवाद्याचा मृतदेह त्यांचे साथीदार घेऊन जाण्यात यशस्वी झाल्याचेही पोलिसांनी पुढे स्पष्ट केले. यात एका महिलेचा समावेश होता. या महिलेने माओवाद्यांचा ड्रेस परिधान केला होता. तिच्या मृतदेहाजवळून एक इन्सास रायफल आणि एक 12 बोअरची बंदूक जप्त करण्यात आली आहे.