
बीए /बीएस्सी, बीएड, बीएड-एमएड या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन पद्धतीने तीन स्वतंत्र सीईटी परीक्षा घेतली जाते. या अभ्यासक्रमांची शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम व शैक्षणिक कालावधीसुद्धा वेगवेगळे आहेत. त्यामुळे या परीक्षांचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.
बीएड अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन शिक्षण क्षेत्रात येण्याचा विचार करणाऱ्या उमेदवारांना सीईटी परीक्षा दिल्याशिवाय बीएड अभ्यासक्रमास प्रवेश मिळत नाही, मात्र बीएडचे तीन स्वतंत्र अभ्यासक्रम आहेत. बीए/बीएस्सी हा अभ्यासक्रम चार वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला बारावीमध्ये किमान 50 टक्के गुण असणे गरजेचे आहे. तसेच मागासवर्ग प्रवर्गाच्या विद्यार्थ्याला 45 टक्के गुण असणे गरजेचे आहे. या अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा 2 मे रोजी घेतली जाण्याची शक्यता आहे. बीएड-एमएड हा तीन वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स असून या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा 2 मार्च रोजी घेतली जाऊ शकते. सर्व अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांबाबत अधिक माहितीसाठी cetcell.mahacet.org या वेबसाईटला भेट द्यावी.































































