
घराच्या बांधकामासाठी टाकलेल्या खडीवरून वाद घालत एका कुटुंबावर चाकू, दगडाने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार संभाजी कॉलनी एन-6 परिसरात घडला. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर आजोबा-आजी व नातू तिघेही एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
शहरातील एन-6 परिसरातील संभाजी कॉलनीत रमेश जगन्नाथ पाडसवान (60) हे पत्नी मंदाबाई, मुलगा प्रमोद, सून रोशनी व नातू रुद्राक्ष यांच्यासह राहतात. त्यांच्या घराचे काम सुरू असल्याने त्यांनी घरासमोरील मोकळ्या जागेवर बांधकामासाठी खडी टाकली आहे. या खडीवरून त्यांच्या शेजारी राहणारे काशिनाथ निमोने, मुलगा ज्ञानेश्वर निमोने, गौरव निमोने, सौरव निमोने, काशिनाथ निमोने याची पत्नी शशिकला व जावई मनोज दानवे हे दुपारी पाऊणएक वाजता पाडसवान यांच्या घरासमोर आले. त्यांनी खडीवरून शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे पाडसवान कुटुंब घराबाहेर आले. त्यांनी ‘शिवीगाळ का करता?’ अशी विचारणा केली. त्यावर काशिनाथ निमोने यांनी रमेश पाडसवान यांना धक्काबुकी सुरू केली. ते पाहून मुलगा प्रमोद व नातू भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करत असताना निमोने, गौरव निमोने, ज्ञानेश्वर मनोज दानवे, सौरव निमोने यांनी प्रमोद पाडसवान यास मारहाण सुरू केली त्यातच तो जमिनीवर निमोने याने थेट चाकूने प्रमोदच्या पाठीवर वार केले. त्यामुळे प्रमोद रक्ताच्या थारोळ्यात पडताच जीव वाचविण्याच्या उद्देशान असताना सौरव निमोने, काशिनाथ निमोने व मनोज दानवे यांनी पकडून मारहाण करून पत्नी शशिकला निमोनेकडून चाकू घेऊन सौरव याने कंबरेवर वार केला. वडील व आजोबाला वाचविण्यासाठी धावून येणाऱ्या रुद्राक्षला पकडून मारहाण करत त्यालादेखील चाकूने भोसकले. पती, मुलगा व नातू रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून हंबरडा फोडत आलेल्या मंदाबाईला हल्लेखोरांनी देखील सोडले नाही. या घटनेनंतर हल्लेखोरांनी काढता पाय घेतला. परिसरातील नागरिकांनी जखमी रमेश पाडसवान, प्रमोद पाडसवान, नातू रुद्राक्ष, पत्नी मंदाबाई यांना तात्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल केले. चाकू लागल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी हल्ला करणाऱ्या सहा जणांविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सौरभनिमोने, आणि त्याचे वडील काशिनाथ निमोणे, जावई मनोज दानवे यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गायके यांनी दिली.
आरोपींच्या अटकेसाठी आज मोर्चा
या हल्ल्याप्रकरणी सहभागी असलेल्या सर्व आरोपींना अटक केल्याशिवाय हल्ल्यात मयत झालेल्या प्रमोद पडसवान याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. सर्व आरोपींना अटक व्हावी यासाठी सिडको एन-6 ते सिडको पोलीस ठाणे दरम्यान उद्या शनिवारी सकाळी 10 वाजता मोर्चा काढण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले