
उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील तुये येथील चिरेखाणीत आंघोळ करण्यासाठी गेलेले तीन विद्यार्थी बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हे विद्यार्थी डॉन बॉस्को बोर्डिंग हायस्कूलचे असल्याचे समजते. ते तिघे भ्रमंतीसाठी गेले असताना ही घटना घडली.
डॉन बॉस्को बोर्डिंग हायस्कूलचे 5 विद्यार्थी चीरे खाणीत साचलेल्या पाण्यात आंघोळीसाठी उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाच जणांपैकी तीन जण बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. या विद्यार्थ्यांपैकी दोघांना बाहेर काढण्यात यश आले असून तिघांचा शोध सुरू आहे.


























































