जम्मू कश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या तीन दहशतवाद्यांनीच शनिवारी कुलगाममधील एका पोलिसाची हाल हाल करून हत्या केली होती. घटनास्थळावरून जवानांनी शस्त्रास्त्रे देखील जप्त केली आहेत.

कुलगाममधील मोहम्मद सलीम या कॉन्स्टेबलचे सुट्टीनिमित्त घरी जात असताना अपहरण करून दहशतवाद्यांनी हत्या केली. शनिवारी संध्याकाळी सलीमचा मृतदेह पोलिसांना छिन्नविच्छिन्न अवस्थेत कैमोह गठ येथे आढळला होता. त्यानंतर या भागात लष्कराच्या व सीआरपीएफच्या जवानांनी व स्थानिक पोलिसांनी मिळून शोध मोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान वानी मोहल्ला भागात दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्यतुत्तर दिले. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.