सुतारवाडीत तीन दुचाकी जाळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील पाषाण परिसरातील सुतारवाडीत तोंडे इमारतीमध्ये पार्क करण्यात आलेल्या तीन दुचाकी जाळल्याची धक्क्दायक घटना घडली आहे. ही घटना काल मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी भाऊसाहेब घोडके (36, रा. सुतारवाडी, पाषाण) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. काल मध्यरात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास इमारतीमध्ये आलेल्या दोघांनी इमारतीत राहणारे भाऊसाहेब तोंडे यांच्या दुचाकीतील पेट्रोल चोरून नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिथेच पार्क करण्यात आलेल्या इतर तीन दुचाकींवर ज्वलनशील पदार्थ टाकून तीन दुचाकी जाळण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सुर्वे अधिक तपास करीत आहेत.