बिग बॉस मराठी मध्ये एकाच वेळी तीन wild card सदस्यांची एन्ट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बिग बॉस मराठी’चा खेळ आता अधिक रंजक आणि आव्हानात्मक वळणावर येऊन पोहोचला आहे. घरातील जुन्या सदस्यांचे समीकरण बिघडवण्यासाठी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी बिग बॉसने आता ‘ट्रिपल धमाका’ करण्याचे ठरवले आहे. एकाच वेळी तीन वाइल्ड कार्ड स्पर्धकांची घरात एन्ट्री होणार असल्याने जुन्या स्पर्धकांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे.