
बोरिवली पश्चिमेला एका निर्माणाधीन इमारतीची मचाण कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बोरिवलीती कल्पना चावला चौकातील सोनी वाडी येथे एका 24 मजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. बांधकामासाठी 16 व्या मजल्यावर एक मचाण बांधण्यात आली होती. या लोखंडी मचाणीवर उभं राहून काही कामगार काम करत होते. दुपारी सव्वाच्या सुमारास ही लोखंडी मचाण अचानक कोसळली. त्यामुळे मचाणीवर उभे असलेले कामगार लोखंडी पाईप्सच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

























































