3 वर्षांच्या जूडचा उत्तर देण्याचा विश्वविक्रम

मेघालय येथील जूड मेनार्ड खिरिएमने सर्वात कमी वयात जास्त प्रश्नांची उत्तरे देऊन विश्वविक्रम केला. जूड मेनार्ड खिरिएम अवघ्या 2 वर्षे 10 महिन्यांचा आहे. एअर चीफ मार्शल अमर प्रित सिंह यांनी नुकतीच जिनिअस जूडची भेट घेऊन त्याचे कौतुक केले. जूड खिरिएमने दोन वर्षे 10 महिने आणि दोन दिवस या वयात हा विक्रम रचला. त्याने 14 मिनिट 43 सेकंदात 76 प्रश्नांची उत्तरे दिली. सर्वात कमी वयात जास्त उत्तरे देणारा मुलगा ठरला. तो जूडच्या एअर फोर्स स्कूलमध्ये शिकतो. त्याला सूर्यमंडळ, अंतराळ या विषयाची गोडी लागली आहे. एवढ्या लहान वयात त्याला या विषयाची असलेली माहिती पाहून सारेच थक्क होतात.