अल्पवयीन मेहूणीवर अत्याचार करणाऱ्याला तीन वर्षांची सक्त मजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर

आठ वर्षीच्या अल्पवयीन मेहूणीवर दारुच्या नशेत अत्याचार करणाऱ्या संदिप बाबासाहेब दुसींग (रा. दत्तनगर, श्रीरामपूर) याला जिल्हा सत्र न्यायाधिश एम. एन. सलिम यांनी आज (ता २४) तीन वर्षांची सक्त मजुरीसह तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दरम्यान हा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात गर्दी होती.

२९ जानेवारी २०१८ ला दुसींग हा पत्नी समवेत दत्तनगर (श्रीरामपूर) येथे आला होता. रात्रीच्या सुमारास संधी मिळताच संदीप यांने आठ वर्षीय मेहूणीवर लैगिक अत्याचार केला. हा प्रकार पत्नीने पाहताच तीने पती संदीप याला जाब विचारला तेव्हा त्य़ाने शिवीगाळ करुन बहिनीसह तिला ठार मारण्याची धमकी दिली. रात्री झालेला प्रकार पिडीत मुलीने तीच्या आईला सांगितला. त्यानंतर पिडीतेच्या नातेवाईकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सदर प्रकरणी ३० जानेवारी २०१८ ला दुसींग विरुध्द बाल लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला.

पोलिसांनी संदीप याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्य़ांने गुन्ह्याची कबुली दिली.न्याय़ालयात हा खटला सुरु असतानी पिडीत मुलीचा जबाब महत्वपूर्ण ठरला. चार साक्षिदाराची तपासणी करण्यात आली. दारुच्या नशेत आरोपीने जाणीवपूर्वक अत्याचार केल्याचा युक्तीवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. साक्षिदार व पुरावे सरकारी वकिलाचे युक्तीवाद यावरुन न्यामुर्ती सलिम यांनी आरोपी संदीप दुसींग याला तीन वर्षाची सक्त मजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारच्यावतीने अॅड. प्रसन्न गटणे, अॅड. बी. एल. तांबे यांनी काम पाहिले.