पुढच्या तीन चार तासांत उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हवामान विभागाचा इशारा

उत्तर महाराष्ट्र आणि संभाजीनगरमध्ये पुढच्या काही तासांत गारपीट होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

भारतीय हवामान विज्ञान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदूरबार, नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच पालघार, पुणे, नगरमध्येही पाऊस किंवा गारपीट होण्याचा अंदाज हवामान खाते, पुणे येथील भारतीय हवामान विभागाचे माजी प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवला जात आहे.