
तिबेटमधील एका व्यक्तीला आर्थिक लाभासाठी बनावट दस्तावेज जमा केल्याप्रकरणी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. अमेरिकन नागरिकतेच्या अहवालातून ही माहिती देण्यात आली आहे. तेनजिन नोरबू (वय 56) असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अमेरिकेत राहून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तेनजिनला 27 महिन्यांचा तुरुंगवास आणि 1,70,000 अमेरिकी डॉलरचा दंड ठोठावला आहे. 2007 ते 2018 यादरम्यान नोरबूने काही लोकांसाठी शरणार्थीचे अर्ज तयार केले. यात खोटी माहिती दिली होती.




























































