चंद्रपुरात मुनगंटीवार आणि जोरगेवार गटात संघर्ष

चंद्रपूर शहर मनपा निवडणुकीत भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार जोरगेवार या दोन्ही नेत्यांच्या गटात तिकीट वाटपावरून संघर्ष पाहायला मिळत आहे. मुनगंटीवार गटाला तिकीट वाटपात डावलल्यामुळे मुनगंटीवार यांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीर उद्या रविवारी भाजपच्या प्रमुख नेत्यांची चंद्रपूरमध्ये बैठक होत आहे. त्यामुळे ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्या 4 जानेवारीला मुख्यमंत्री चंद्रपूर दौऱ्यावर असून त्यांच्या ‘रोड शो’चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेही चंद्रपुरात दाखल होत आहेत.