
बॉलीवूडची डायनॅमिक जोडी कतरिना कैफ आणि सलमान खान पुन्हा एकदा सोबत बघायला मिळणार असून टायगर 3 च्या टीझर ने सोशल मीडिया वर चर्चांना उधाण आलं आहे. टायगर 3 चा हा थरारक भाग गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असताना आज प्रदर्शित झालेल्या एका व्हिडीओने या चर्चांमध्ये भर टाकली आहे.
View this post on Instagram
मनीष शर्मा दिग्दर्शित टायगर 3 त्याच्या अॅक्शन चित्रपटाची मेजवानी सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे. हा थरारपट आता मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार असून काय वेगळं असणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.

























































