
सामना ऑनलाईन | चंद्रपुर
चंद्रपूर जिल्ह्यात एका वाघाचा मृत्यू झाला आहे. सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर जवळच्या जंगलात वाघाचा मृतदेह आढळला असून हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. वाघाचा मृत्यू हा तीन ते चार दिवसांपुर्वी झाला असल्याचा अंदाज वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून वाघाचे सर्व अवयव शाबूत असल्याची माहिती वनवीभानं दिली आहे. वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर कळणार असून वाघाच्या मृत्यूने वन्यजीव प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.




























































