
>> अर्चना रायरीकर, आहारतज्ञ
दिवाळीचा आनंद साजरा करताना आपण आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. याचा अर्थ मी असे सांगत नाही की तुम्ही दिवाळीमध्ये डाएट करा. दिवाळीच्या शुभेच्छा देताना आपण एकमेकांना हेच सांगतो की ही दिवाळी तुम्हाला भरपूर लक्ष्मी, आनंद आणि आरोग्य देवो.
आपली संस्कृती, आपली पारंपरिक पद्धती याचा प्रचंड अभिमान असावा तसेच आपल्या पारंपरिक पदार्थांचादेखील आहे. चकली, शेव, चिवडा, करंजी, लाडू, कडबोळी, चिरोटे वगैरे हे पारंपरिक पदार्थ नक्की खावेत, पण आज आपण अशा काही टिप्सचा विचार करणार आहोत की जी आपली दिवाळी आनंदी तर बनवेलच, परंतु आरोग्यदायीदेखील बनवेल.
आपले सारे सण आणि उत्सव वातावरणातील बदलाशी निगडित आहेत. शिवाय आपला देश शेतीप्रधान! शिवाय हा सुगीचा काळ! भरपूर शारीरिक कष्ट केल्यानंतर उत्तम कॅलरीज खाण्याचा हा काळ…
दिवाळीमध्ये आपण खूप आपले पारंपरिक पदार्थ बनवत असतो आणि खात असतो. त्यामध्ये जास्त करून मैदा आणि साखरेचा वापर केला जातो. पूर्वी हे सगळे खाणे फक्त आणि फक्त सणासुदीला होत असे, पण आता सर्व बदलले आहे. तयार दिवाळी पदार्थ, त्यातले तेल स्वतः कष्ट करून न केल्याने तयार आणल्याने वाट्टेल तसे खाल्ले जाणे, खाण्यात शिस्त नसते, कृत्रिम साखर, रंग, स्वाद घातलेल्या वर्ख लावलेल्या मिङ्गाया, बैङ्गी जीवनशैली, भेसळयुक्त पदार्थ या सर्व पार्श्वभूमीवर घरी करून खाणे कधीही चांगले किंवा मागवायचे असेल तर खात्रीच्या माणसाकडून घ्यावे.
काही टीप्स याप्रमाणे…
जिकडे जिकडे शक्य आहे तिथे आपण मैद्याऐवजी गहू वापरू शकतो तसे साखरेऐवजी आपण गूळ, अंजीरे, खजूर याचा वापर करू शकतो.
आपल्याला माहितीच आहे की, मैदा एक रिफाइंड पदार्थ आहे आणि गव्हामध्ये तंतुमय पदार्थ जास्त असतात तसेच साखरेमध्ये कुठलेही पोषक घटक नाही. त्याच्याऐवजी गूळ, अंजीर, खजूर वापरले तर आपल्याला त्यातून चांगल्या पोषक घटक मिळू शकतात. गूळ रसायनमुक्त असावा.
n बाहेरचे पदार्थ म्हणजे हे सर्व पदार्थ टिकण्यासारखे व्हावे म्हणून यात पाम तेल किंवा रिफाइंड तेल वापरले जाते. शिवाय त्याच त्याच तेलात तळलेले असते. या काळात थंडी सुरू होत असल्याने आणि पचन शक्तीदेखील चांगली होत असल्याने हे पदार्थ जास्त उष्मांक आणि उष्णता देत असत आणि असे पदार्थ खाण्याचा हा उत्तम असा काळ असे म्हणून असे बनवले जात.
पदार्थ तळताना तेलाचा स्मोकिंग पॉइंट महत्त्वाचा असतो. जितका धूर लवकर तितका स्मोकिंग पॉइंट कमी. बाहेरचे तळलेले पदार्थ शक्यतो टाळावेत आणि तळलेले खायचे झाल्यास घरी करावे आणि ते सूर्यफूल तेलात किंवा शेंगदाणा तेलात करावे म्हणजे त्याचा स्मोकिंग पॉइंट चांगला असतो. बाहेरचे तेल परत परत वापरले जाते त्यामुळे ट्रान्स फेट्ससारखे हानिकारक घटक तयार झालेले असतात. घरी तळून आले की उरलेले तेल घट्ट झाकणाच्या डब्यात ङ्खेवून 2-3 दिवसांत संपवावे. शक्यतो कोल्ड प्रेसड किंवा घाण्यावरचे किंवा फिल्टर्ड तेल वापरावे.
दिवाळीच्या दिवसांत उलटसुलट खाल्ले जातेच. यामुळे ऑसिडिटी होऊ शकते, पोट साफ होत नाही. त्यामुळे भरपूर पाणी प्या, हलका नियमित आहार घ्या आणि भाज्या, फळे, कोशिंबीर आवर्जून खा. तसेच वेळ मिळेल तसा व्यायाम करा. चाला. सकाळी मस्त गुलाबी थंडी असते.
भेट म्हणून कृत्रिम रंग आणि साखरयुक्त मिङ्गाई आणि चॉकलेटपेक्षा ताजी सुंदर फळे आणि सुका मेवा द्या. अशाप्रकारे दिवाळी पारंपरिक, आरोग्यमय आणि सुंदर होऊ दे.





























































