
घरात एकदा झुरळांचा शिरकाव झाला की, मग ती अनेक प्रयत्न करूनही कमी होत नाहीत. अशा वेळी काही घरगुती उपाय करता येतील. लसूण बारीक करून त्यात व्हिनेगर घाला आणि हा स्प्रे बाटलीत भरून झुरळ असलेल्या ठिकाणी फवारा.
या पद्धतीने लाल तिखट किंवा लिंबूदेखील वापरू शकता. बोरिक पावडर मैद्यामध्ये घालून त्याच्या गोळ्या बनवा. झुरळांचा संचार असलेल्या ठिकाणी या गोळ्या ठेवा. कापूर बारीक करा आणि झुरळांच्या जागी ठेवा.
































































