टीप्स: चमचमती त्वचा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • साबुदाणा बारीक करून त्यामध्ये दही मिसळा. हे मिश्रण लावल्याने काही मिनिटांतच त्वचेची चमक वाढते.
  • साबुदाण्यामध्ये कॅल्शिअम, मिनरल्स हे घटक आहेत. यामुळे रंग उजळण्यास मदत होते. चेहरा आणि केसांची चमक वाढते. दह्यामुळे त्वचेची पीएच पातळी नियंत्रणात राहते आणि त्वचा कोमल आणि तजेलदार होते.
  • हेच मिश्रण आठवड्यातून चारवेळा लावल्याने लवकर फायदा होईल.
  • हे मिश्रण डोक्यावर लावल्याने कोंडा दूर होतो. केस चमकदार होतात. आरोग्यदायी त्वचा आणि केस या दोन्हींसाठी खास आहे.
  • केळी आणि दुधासारखे निरोगी पदार्थ आहारात असले पाहिजेत. कारण त्यामुळे त्वचा आणि केस दोन्हीही आरोग्यदायी राहतात. चेहऱ्याचे सौंदर्य वाढते.
  • त्वचेवर कोणतीही रसायने वापरणे टाळा. झोपण्यापूर्वीही मेकअप काढून टाकायला विसरू नका.
  • त्वचा चमकदार ठेवण्यासाठी दररोज किमान सात तासांची झोप घ्या. तणावात राहू नका. कारण झोप पूर्ण न होण्याचा आणि तणावात राहण्याचा त्वचेवर वाईट परिणाम होतो.