लॅपटॉपचा आवाज कमी झाला असेल तर…

 

– नवीन लॅपटॉपचा काही महिन्यांनंतर आवाज कमी होतो. हा आवाज नेमका कशामुळे कमी होतो आणि असे झाले तर काय कराल.

– सर्वात आधी लॅपटॉपच्या टास्कबारमध्ये व्हॅल्यूम आयकॉनवर क्लिक करून व्हॅल्यूम किती आहे ते पहा. कमी असेल तर वाढवा.

– स्पीकर आणि हेडपह्न व्यवस्थित कनेक्टेड आहेत की नाही ते तपासा. अा@प्लिकेशनमधील व्हॅल्यूम सेटिंग्ससुद्धा तपासा.

– लॅपटॉपचे ऑडिओ ड्रायव्हर्स अपडेट करू शकता. लॅपटॉपच्या डिव्हाईस मॅनेजरमध्ये जाऊन ऑडियो ड्रायव्हर्स अपडेट करा.

– कधी कधी सेटिंग्समुळे ऑडिओ समस्या येण्याची शक्यता असते. त्यामुळे लॅपटॉपच्या ऑडिओसंबंधित सेटिंग्स योग्य आहे का ते पहा.