पैसा टिकावा, वाढावा म्हणून…

– तुम्ही किती कमावता यापेक्षा तुम्ही किती व कसा खर्च करता हे जास्त महत्त्वाचे असते. त्यामुळे खर्चावर लक्ष ठेवा.
– रोजच्या खर्चाची डायरीत नोंद करून ठेवा. हल्ली मोबाइलमध्ये त्यासाठी अनेक अॅपही येतात. त्यातही ही नोंद ठेवता येईल. ही नोंद करून ठेवल्यावर दर महिन्याला त्याचा आढावा घ्या. टाळता येण्याजोग्या खर्चाची यादी करा. पुढील महिन्यात तो खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा.
– बचतीची सवय लावा, पण बचत करून घरात ठेवून देऊ नका. तसे केल्याने त्या पैशाचे मूल्य कमी होईल. हे मूल्य वाढवण्याचा विचार करा. त्यासाठी पैसे योग्य ठिकाणी गुंतवा.