
> घरात डासांना घालवण्यासाठी वापरत असलेल्या लिक्विड रिफीलमध्ये लिंबूचा रस टाकून वापरू शकता. याने सर्व डास मरतात. हा प्रयोग आठवडय़ातून दोनदा करावा. तसेच निलगिरीच्या तेलात लिंबाचा रस मिश्रण करूनही लावू शकता.
> ऑल आऊटसारखे एक रिकामे रिफील घ्या. त्याचे झाकण उघडून त्यामध्ये कापराची पावडर करून घाला. यानंतर त्यामध्ये तारपीन तेल घाला. तारपीन तेल हार्डवेअरच्या दुकानात मिळते. आता रिफीलचे झाकण बंद करा. तारपीन तेलात कापूर विरघळायला हवा. अशा प्रकारे हे नवीन घरगुती पद्धतीने तयार केलेले रिफील जास्त चालेल आणि त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही. यामध्ये असलेले कापूर मच्छर आणि इतर किटाणूही संपवेल.
> लवंगच्या तेलाच्या वासाने मच्छर पळतात. त्यामुळे खोबऱयाच्या तेलात लवंगाच्या तेलाचं मिश्रण करून ते अंगावर लावा. यामुळे डास चावणार नाहीत. तेलाचं हे मिश्रण ओडोमॉससारखं काम करतं.
> झेंडूच्या फुलांच्या सुगंधाने घर प्रसन्न होतं. ही झाडे घराभोवताली लावा. झेंडूच्या फुलांच्या वासाने डास दूर पळतात. घरातही ही कुंडी ठेवली तर घरात डास येणार नाहीत.
> कडुलिंबाचे तेलही रिफीलमध्ये घालून वापरू शकता. यामुळेही डासांचा त्रास दूर होईल.
> डासांचा त्रास कमी करण्यासाठी कापुराची एक वडी जाळून खोलीत ठेवा. यातून निघणाऱया सुगंधाने डास निघून जातील. हा उपाय सर्वात सोपा आहे.
























































