
धूम्रपानामुळे फुफ्फुसांचा कॅन्सर, हृदय विकार आणि इतर अनेक आजार होण्याचा धोका संभवतो. धूम्रपानाच्या सवयीपासून सुटका करण्यासाठी हे पदार्थ मदत करतील …
- आल्यामध्ये ऍन्टीऑक्सिडंट आणि ऍन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे धूम्रपानाची सवय सोडवण्यासाठी मदत होते. आलं खाल्ल्यामुळे शरीराला उष्णता मिळते. शरीरातील विषारी घटक घामावाटे शरीराबाहेर टाकले जातात. यामुळे सिगारेटची सवय सोडवायला मदत होते.
- सिगारेट पिण्याची इच्छा कमी करण्यासाठी लाल मिरचीची मदत होते. लाल मिरचीमध्ये ऍन्टीऑक्सिडंट गुणधर्म असतात. मिरचीची तिखट आणि तीव्र चव धूम्रपान करण्याची इच्छा रोखण्यासाठी आवश्यक ठरतात.
- अश्वगंधा शारीरिक आणि भावनिक तणावासोबत शरीरात होणाऱ्या अन्य आजारांच्या लक्षणांना संतुलित करतात. यामुळे हानिकारक विषारी पदार्थ शरीरातून बाहेर टाकले जातात. फुफ्फुसे स्वच्छ होतात . नाश्त्यावेळी ग्लासभर दुधात एक चमचा अश्वगंधा पावडर एकत्र करून प्यायल्याने धूम्रपान करण्याची इच्छा कमी होते.
- धूम्रपानाची सवय सोडवण्यासाठी पेपरमिंटच्या गोळ्या खाणं हा उत्तम उपाय आहे. याचा गंध आणि चव धूम्रपान करण्यापासून रोखण्यासाठी मदत करते. पेपरमिंटमध्ये ऍन्टीऑक्सिडंट आणि ऍन्टीफंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे धुम्रपान करण्याची इच्छा होत नाही. पोटाच्या समस्या सोडवण्याचे गुणधर्मही यामध्ये असतात.





























































