टीप्स-औषधी फुले

टीप्स -औषधी फुले

  • गुलाबाचे फुल हे कोमलता आणि सुंदरतेचे प्रतीक मानले जाते. तसेच त्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्यास हिरड्या आणि दात मजबूत होतात. तोंडातील दुर्गंधी दूर होते. तसेच गुलाब पाण्याने निद्रानाश, नेत्ररोग आणि मूत्रव्याधीचा त्रास कमी होण्यात मदत मिळते. गुलकंदाच्या सेवनाने रंग उजळतो, चेहऱ्यावरचे डाग, मुरमे दूर होतात, उन्हाळ्याचा त्रास कमी होतो.
  • चाफा हे एक सुगंधी फुल आहे. त्याच्या अनेक जाती आहेत. चाफ्याची  फुले ज्वरहर, उत्तेजक, दाहनाशक आणि नेत्र ज्योतिवर्धक असतात. रक्तविकार, विषबाधेतही यांचा लेप लाभदायक असतो.
  • सौंदर्य आणि सुगंधाचा उत्तम मिलाफ म्हणजे पारिजातक. पारिजातकाच्या पानांचा रस ज्कर, कफ, कृमी, पित्ताचे किकार, संधीकात यावर गुणकारी मानला जातो. याचा काढा कंबरेच्या दुखण्याकर फायदेशीर असतो. ही फुले वातहर व केसांसाठी लाभदायी असतात.
  • केवडय़ाची फुले ही सुगंधी आणि बहुगुणी वनस्पती आहे. केवडय़ाची फुले शीतल, कांतिदायक, वेदना निवारक आहेत. तसेच डोळ्यांसाठी गुणकारी असतात. रक्तप्रदर, मायग्रेनमध्ये लाभदायक. फुलांचा रस कानासाठी चांगला. केवडय़ाच्या तेलाचा उपयोग आमवात, कंबरदुखी, डोकेदुखीसाठी उपयुक्त आहे, त्वचारोगासाठी, त्वचेचा वर्ण सुधारण्यासाठी उपयोग होतो.
  • जास्वंदाची फुले मलरोधक, केशवर्धक असतात. फुलांचा रस केसांना लाकल्यास केसांचा पांढरेपणा कमी होतो. फुलांचे पाणी घेतल्यास मळमळ, आम्लपित्त यासाठी लाभ होतो.
  • हृदयरोगासाठी सूर्यफुलाचे तेल चांगले असते. रक्तकिकार, योनीशूल, यकृतरोग आणि फुफ्फुसांच्या किकारात सूर्यफुलांचा चांगला उपयोग होतो.