
विषबाधा झाली तर!
- विषबाधा झालेल्या व्यक्तीला थंड पाणी पिण्यास द्यावे.
- शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करा. कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवा आणि थंड पाणी घेऊन मान, पाठ, हातपाय चोळा.
- तिला आकडी किंवा फिट येत नाही ना हे तपासावे.
- व्यक्ती बेशुद्ध नसल्यास उपचारांना प्रतिसाद देऊ शकते.
- विषग्रस्त व्यक्तीला शक्य तितक्या लवकर दवाखान्यात न्या.
- विषारी पदार्थाचा मूळ डबा किंवा बाटली जपून ठेवावी. कारण त्यावरच विषावरील उतारा छापलेला असतो. डॉक्टरांनाही तो पाहाणे आवश्यक आहे. तसे डॉक्टरांना सुचवावे.
- पोटात काय गेले आहे, किती प्रमाणात आणि केव्हा गेले आहे हे माहीत करून घेण्याचा प्रयत्न करावा.
- विष घेतलेल्या व्यक्तीचे तोंड तपासावे. तोंडात जळल्याच्या, भाजल्याच्या खुणा असल्यास आणि अन्न गिळायला त्रास होत नसल्यास शक्य तितके जास्त दूध किंवा पाणी पिण्यास द्यावे.
- उलटी झाल्यास ती प्लास्टिकच्या पिशवीत किंवा चिनीमातीच्या भांड्यात साठवण्याचा प्रयत्न करावा.
- बेशुद्ध झाल्यास प्रथम श्वास तपासा.
- श्वास चालू असल्यास अशा व्यक्तीला विशिष्ट स्थितीमध्ये, शरीरापेक्षा पाय किंचित वर ठेवून झोपवा.
- अगदी लहान मूल असल्यास त्याला मांडीवर, डोके खालच्या पातळीवर येईल, अशा पद्धतीने झोपवू शकता.
- बऱ्याचशा विषांमुळे श्वसन थांबण्याचा धोका असतो.

























































