पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची हत्या

पश्चिम बंगालमधील बर्धमान जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. इसान मलिक असे त्या नेत्याचे नाव असून ते कलना पंचायत समितीचे खजिनदार होते. तृणमूल काँग्रेसने या हत्येसाठी विरोधकांना जबाबदार धरले आहे. मात्र मलिक यांच्या पत्नीने त्यांच्या मृत्यूसाठी तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत वादाला जबाबदार धरले आहे. त्यामुळे भाजपविरोधात लढता लढता तृणमूलमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत.

लोकसभा निवडणकीपासून पश्चिम बंगालमध्ये भाजप व तृणमूल काँग्रेसमध्ये हिंसाचार सुरू आहे. या दोन्ही पक्षांचे अनेक कार्यकर्ते व नेत्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. तसेच दोन्ही पक्ष एकमेकांच्या रॅलीमध्ये धुमाकूळ घालत होते. लोकसभा निवडणूका पार पडून सहा महिने उलटले तरी अद्याप या दोन्ही पक्षातील वाद मिटलेला नाही. त्यामुळे आजही पश्चिम बंगालमध्ये या दोन पक्षांत धुसफूस होताना दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या