
सामना ऑनलाईन | नाशिक
शिवसेना, भाजपा, रिपाई, रासप, शिवसंग्राम महायुतीचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आज शुक्रवारी दि 5 एप्रिल रोजी महायुतीचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. गंगापूररोडजवळील श्रद्धा लॉन्स येथे होणार्या या कार्यक्रमात शिवसेना नेते, उत्तर महाराष्ट्र विभागीय नेते, खासदार संजय राऊत, जलसंपदा मंत्री, नाशिकचे पालकमंत्री, महायुतीचे समन्वयक गिरीष महाजन हे मार्गदर्शन करणार आहेत.
श्रद्धा लॉन्स येथे सायंकाळी 5 वाजता बुथप्रमुख, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा महामेळावा होणार आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, भाजपा प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनी दिली. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, उपनेते बबनराव घोलप, भाजपा उपाध्यक्ष सुनील बागुल, वसंत गीते, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सिमा हिरे, आमदार राहुल आहेर, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार अनिल कदम, आमदार योगेश घोलप, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, महापालिका सभागृह नेते दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना गटनेते विलास शिंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव, रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, सुधाकर बडगुजर, शिवसेना महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे यांच्यासह समन्वय समितीचे सदस्य हजर राहणार आहेत.
प्रचार कार्यालयांना भेटी
शिवसेना नेते, उत्तर महाराष्ट्र विभागीय नेते, खासदार संजय राऊत हे शुक्रवारी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या नाशिक शहरातील प्रचार कार्यालयांना भेटी देणार आहेत.
- ठिकाण व वेळ पुढीलप्रमाणे
- देवळाली- सकाळी 10
- नाशिकरोड- 10.30
- द्वारका- 11
- पंडित कॉलनी- 11.30
- पंचवटी- दुपारी 12
- सिडको- 12.30
- सातपूर- 1 वाजता


























































