चिमुरडी गातेय “लग जा गले..” नेटकरी म्हणताहेत ही तर ‘छोटी लता’

1512

लता दीदींनी गायलेलं ‘लग जा गले’ हे गीत आठवत नाही, असा दर्दी ‘कान’सेन विरळाच. ‘वो कौन थी’ या 1964 साली प्रदर्शित झालेल्या या गाण्याचे बोल राजा मेहंदी अली खान यांचे होते. तर मदन मोहन यांनी हे अजरामर गीत संगीतबद्ध केलं होतं. आजही बॉलिवूडच्या अजरामर आणि क्लासिक गाण्यांपैकी एक असलेलं हे गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

या गाण्याचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. पण, या व्हिडीओतली गायिका मात्र लता दीदी नसून एक चिमुरडी आहे. या मुलीचं नाव प्रज्ञा असून तिच्या आईने ती गाणं गातानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ही चिमुकली प्रज्ञा अगदी सुरेल आवाजात लता दीदींचं लग जा गले हे गाणं अगदी आत्मविश्वासाने गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला तुफान प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी ही छोटी मुलगी म्हणजे छोटी लता असल्याचं म्हणत तिचं कौतुक केलं आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या