महामार्गावरील ‘टोल’ महागला, आजपासून होणार अंमलबजावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
toll-plaza

सामना ऑनलाईन । पुणे

शहरातून जाणाऱ्या पुणे-बंगळुरू, पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक या महामार्गावरील टोलदरात सुमारे चार टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. केंद्र सरकार महागाईच्या निर्देशांकानुसार प्रत्येक वर्षी राष्ट्रीय महामार्गावरील टोलच्या दरात कमी-अधिक प्रमाणात वाढ करीत असते. नव्याने लागू करण्यात येणारी दरवाढ 1 एप्रिलपासून लागू होत असते. या वर्षीदेखील टोलचे दर वाढवण्यात आले आहेत.

पुणे-बंगळुरू महामार्गावरील आणेवाडी आणि खेड-शिवापूरचा टोलनाका नॅशनल हायवे ऍथॉरिटीच्या अखत्यारीत येतो, तर नाशिक महामार्गावर चाळकवाडी येथे टोलनाका आहे. चाळकवाडी टोलनाक्यावर नव्या नियमानुसार एकेरी वाहतुकीसाठी 40 रुपयांऐवजी 45 रुपये टोल द्यावा लागणार आहे. सध्या आणेवाडी टोलनाक्यावर कार, जीप आणि व्हॅनला सिंगल एण्ट्रीसाठी 60 रुपये आणि डबल एण्ट्रीसाठी 95 रुपये टोल आकारण्यात येतो. लाइट मोटर व्हेइकलला सिंगल एण्ट्रीसाठी 100 रुपये आणि मल्टिपल एण्ट्रीसाठी 150 रुपये, ट्रक, बसना सिंगल एण्ट्रीसाठी 210 रुपये आणि मल्टिपल एण्ट्रीसाठी 315 रुपये आकारण्यात येतात, तर खेड-शिवापूर टोलनाक्यावर कार, जीप आणि व्हॅनला एकेरी काहतुकीसाठी 90 रुपये आणि मल्टिपल एण्ट्रीसाठी 135 रुपये आकारण्यात येतात. हलक्या जड वाहनांना एकदा जाण्यासाठी 145 रुपये आणि मल्टिपल एण्ट्रीसाठी 215 रुपये टोल द्यावा लागतो.

खेड-शिवापूर टोलनाका
एकेरी  – दुहेरी
कार, जीप आणि व्हॅन – 95   – 140
लाइट मोटारव्हेइकल – 150 – 225
ट्रक आणि बस – 315 –  475

आणेवाडी टोलनाका
एकेरी – दुहेरी
कार, जीप आणि व्हॅन- 65  – 95
लाइट मोटारव्हेइकल – 105  – 155
ट्रक आणि बस – 220 – 330

ट्रक आणि बसना एकदा जाण्यासाठी आकारण्यात येणारा टोल 305 रुपये आणि मल्टिपल एण्ट्रीसाठी 455 रुपये भराके लागतात. या रकमेत सुमारे चार टक्के वाढ झाली आहे. यानुसार आजपासूनच नव्या दरानुसार टोल आकारणी केली जाईल, असे नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडियाचे पुणे विभागप्रमुख सुहास चिटणीस यांनी सांगितले.