गाडीत पेट्रोलऐवजी टोमॅटो भरा… किंमत तीच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंधन महागले, गॅस महागला, खाद्यान्नांचे भाव वाढले. सर्वसामान्य नागरिक महागाईने पिचला आहे. तीनशे पटींनी महागाई वाढली आहे. पेट्रोलचा भाव 111 रुपये लिटर झाला आहे. आता टोमॅटोही तिथपर्यंत पोहोचण्याच्या तयारीत आहे. शंभरी गाठलेला टोमॅटो काही खाली उतरायला तयार नाही आणि नवा टोमॅटो बाजारात आलेला नाही. त्यामुळे काही दिवसांत एक लिटर पेट्रोलइतका एक किलो टोमॅटो झाला आणि कुणी ‘पेट्रोलऐवजी टोमॅटो भरा…किंमत तीच’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली तर आश्चर्य नाही.

मागच्या महिन्यापासून टोमॅटोची

आवक हळूहळू कमी व्हायला लागली होती. 40 रुपये, 60 रुपये, 80 रुपये किलोवरून वाढत तो शंभर रुपये किलोवर पोहोचला. अधूनमधून त्यात चढउतार सुरू असतो. इंधन दरवाढीमुळे वाहतूक महागली असल्याने शेतातून टोमॅटो बाजारात पोहोचवण्याचा खर्चही वाढला आहे. त्याचाही परिणाम दरावर होत आहे.

पुण्यात दळणही महागले

पुण्यातील चक्कीवाल्यांनी दळणाचे दर एक रुपयाने वाढवले आहेत. 1 जूनपासून प्रतिकिलो दळणासाठी आठ रुपये मोजावे लागणार आहेत. पुणे शहर जिल्हा पीठ गिरणी मालक संघाच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी दळण सात रुपये किलो होते. आता मुंबईसह इतर भागात दळणाचा दर काय होणार या टेन्शमध्ये गृहिणी आहेत.

भाजीचा किलोचा दर

भेंडी 80
लसूण 120
ढोबळी मिरची 100
चवळी 80
वाटाणा 120

मेट्रो शहरातील दर

शहर डिझेल पेट्रोल
मुंबई 97.28 111.35
कोलकाता 92.76 96.72
चेन्नई 94.24 102.63
दिल्ली 89.62 96.72