
आपल्या स्वयंपाकघरातला टोमॅटो केवळ खाण्यासाठी नाही तर, सुंदर दिसण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. भाज्यांची चव वाढवणारा टोमॅटो आपल्या त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाही. चेहऱ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची स्किन केअर उत्पादने वापरुन तुम्ही कंटाळले असाल तर, टोमॅटोचा आता वापर करुन बघा. टोमॅटोच्या रसात काही गोष्टी मिसळून फेसपॅक बनवून पहा. हे तुमची त्वचा चमकदार आणि मऊ मुलायम होण्यास मदत करेल. तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी दिनचर्येत टोमॅटोचा समावेश करा. केवळ 10 दिवसांमध्ये तुमची त्वचा चमकदार होईल.
टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावण्याचे फायदे
टोमॅटोमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. त्यात व्हिटॅमिन ए, के, सी, लायकोपीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेची नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात ते चेहऱ्यावर लावल्याने टॅनिंगची समस्याही कमी होते.
टोमॅटो आणि मधाचा फेस पॅक बनवण्यासाठी, एका भांड्यात टोमॅटोचा लगदा काढा, नंतर त्यात दही, बेसन घाला आणि फेस पॅक बनवा. आता ते 15- 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा मऊ होईल आणि तुम्हाला त्वरित चमक देखील मिळेल.
टोमॅटो आणि हळद दोन्ही त्वचा स्वच्छ करण्यास मदत करतात. एका भांड्यात टोमॅटोचा रस काढा आणि त्यात थोडी हळद आणि गुलाबजल घाला. नंतर हा फेस पॅक चेहऱ्यावर 10-15 मिनिटे लावा. यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकू लागते आणि हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात जे तुमच्या चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या कमी करण्यास मदत करतात.
टोमॅटो आणि कॉफीचा फेस पॅक बनवण्यासाठी, एका भांड्यात थोडे दही, टोमॅटोचा रस आणि कॉफी पावडर मिसळा. नंतर ते चेहऱ्यावर 15 मिनिटे लावा आणि नंतर चेहरा धुवा. तेलकट त्वचा असलेल्यांसाठी हा फेस पॅक सर्वोत्तम आहे.
टोमॅटो आणि लिंबू दोन्हीमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ते त्वचा स्वच्छ आणि नितळ होण्यास मदत करते. यासाठी एका भांड्यात टोमॅटोच्या रसात लिंबाचा रस मिसळा आणि तो चेहऱ्यावर 10-15 मिनिटे लावा आणि नंतर चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल.
उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी टोमॅटो आणि काकडीचा वापर करू शकता. यासाठी टोमॅटो आणि काकडीचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील टॅनिंग देखील कमी होते.