
सामना ऑनलाईन, वॉशिंग्टन
जगातील प्रदूषित शहरांमध्ये हरयाणातील गुरुग्राम हे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. जगभरातील टॉप 10 प्रदूषित शहरांमध्ये हिंदुस्थानची सात शहरे असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आयक्यु एअरव्हिज्युअल्स अँड ग्रीन पीस संस्थेच्या अहवालाची ही माहिती आहे.
आयक्यू एअरव्हिज्युअल्स अँड ग्रीन पीस संस्थेने पीएम 2.5 प्रदूषित कणांच्या आधारे प्रदूषणाची पातळी मोजली आहे. हिंदुस्थानची अर्थव्यवस्था जलद गतीने वाढत आहे. 30 प्रदूषित शहरांमध्ये हिंदुस्थानच्या 22 शहरांचा समावेश आहे.
चीनच्या पाच, पाकिस्तानच्या दोन आणि बांगलादेशच्या एका शहराचा समावेश आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार प्रदूषणामुळे हिंदुस्थानच्या जीडीपीमध्ये 8.5 टक्के नुकसान झाले आहे.
प्रदूषणाची पातळी कमी करण्यात चीनने बरेच यश मिळवले आहे. चीनमध्ये 2017 सालच्या तुलनेत 2018 साली 12 टक्के प्रदूषण कमी झाले आहे असा निष्कर्ष ग्रीन पीसच्या अहवालात आहे.
शहर प्रदूषणाची पातळी
- गुरुग्राम (हरयाणा) 135.8
- गाझियाबाद (उत्तर प्रदेश) 135.2
- फैसलाबाद (पाकिस्तान) 130.4
- फरिदाबाद (हरयाणा) 129.1
- भिवाडी (राजस्थान) 125.4
- नोएडा (उत्तर प्रदेश) 123.6
- पाटणा (बिहार) 119.7
- होतान (चीन) 119.7
- लखनौ (उत्तर प्रदेश) 115.7
- लाहोर (पाकिस्तान) 114.7

























































