जम्मू कश्मीरमध्ये हिजबूलचा टॉपचा कमांडर ठार

1566

जम्मू कश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील गोंदाना भागात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत हिजबूल मुजाहिद्दीनच्या टॉपच्या कमांडरचा खात्मा करण्यात आला आहे. हारुन वाणी असे त्या दहशतवाद्याचे नाव असून तो हिजबूलचा A++ कॅटेगरितील दहशतवादी होता.

हारुन वाणी याच्यासह तीन दहशतवादी गोंदान बेल्टच्या जंगलाजवळ लपून बसले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी जवानांना दिली होती. त्या माहितीच्या आधारे जवानांनी त्या भागात शोध मोहिम सुरू केली. त्यावेळी जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हारुन वाणीचा खात्मा करण्यात आला. तर इतर दोन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले त्या दोघांना शोधण्याची मोहिम सुरू आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या