
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्याला काही अटींसह परवानगी दिली आहे. या अटींमध्ये दिल्ली आणि आसपासच्या परिसरात ग्रीन क्रॅकर्स म्हणजे पर्यावरणपूरक फटाक्यांनाच परवानगी देण्यात आली होती. मात्र हे हिरवे फटाके मिळतात कुठे हे दिल्लीकरांना माहितीच नाहीये. शोधूनही हे हिरवे फटाके न सापडल्याने सदर बाजार परिसरातील व्यापाऱ्यांनी भेंडी, मिरची, कोबी,कारली अशा हिरव्यागार भाज्या शोधून त्यात फटाके भरले आणि मग ते फोडले.
Delhi: Sadar Bazar Welfare Association is staging a protest against the SC order on green crackers, by putting firecrackers inside green vegetables. President of the Association HS Chhabra says “We don’t even know what green crackers are. There is no green cracker in the market.” pic.twitter.com/xKso23wtUe
— ANI (@ANI) November 7, 2018
इथल्या व्यापाऱ्यांच्या संघटनेचे अध्यक्ष एच.एस.छाब्रा यांनी यावेळी बोलताना सांगितलं की हे हिरवे फटाके मिळतात कुठे हे सांगण्यात आलेलं नाही. छाब्रा म्हणाले की “आम्ही पोलिसांना विनंती केली की हिरव्या फटाक्यांची एक यादी आम्हाला देण्यात यावी. आज देतो,उद्या देतो असं सांगत पोलिसांनी आम्हाला तंगवलं. बाजारात हे पर्यावरणपूरक फटाकेच नसतील तर त्याची यादी मिळणार तरी कुठून”. दिवाळीचा एक वर्ष आधी जर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असता तर कदाचित हे फटाके मिळाले असते असं छाब्रा यांचं म्हणणं आहे. सदर बाजारमधल्या व्यापाऱ्यांनी केलेलं हे आंदोलन सध्या दिल्लीकरांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.





























































