
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहे. भाविकांची बोलेरो गाडी अनियंत्रित होऊन कालव्यात कोसळली. बोलेरोमध्ये एकूण 15 जण होते, त्यापैकी 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 4 जण गंभीर जखमी झाले.
ही घटना गोंडा जिल्ह्यातील इटियाथोक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहरा गावातील आहे. बोलेरोमधील सर्व लोक दर्शनासाठी जात होते. मुसळधार पावसामुळे गाडी अनियंत्रित होऊन कालव्यात कोसळली. अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासकीय पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहेत. गोंडा जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातात जीवितहानी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आणि जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्याचे आणि त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.