‘धप्पा’चा ट्रेलर प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘‘तुला माहीत आहे ना, बाहेरचं जग कसं आहे?’’ या प्रश्नावर ‘बाहेरच्या जगाला सामोरे जाण्याचा तो प्रयत्न करतोय, त्याला दुबळं नको बनवू’, असा संवाद कोणत्याही पालकांमध्ये आज होत नाही. मात्र निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘धप्पा’ या मराठी चित्रपटातील हा संवाद काही तरी वेगळे सांगू पाहत आहे,  विशबेरी फिल्मस् प्रस्तुत, इंक टेल्स आणि अरभाट फिल्म्स निर्मित या चित्रपटाला 65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात राष्ट्रीय एकात्मतेवरचा सवोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘नर्गिस दत्त’ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे. ‘धप्पा’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लहान मुले गणेशोत्सवासाठी ‘झाडे पळाली’ हे नाटक बसविण्याचा निर्णय घेतात, ज्यामध्ये पर्यावरण संरक्षणविषयीचा संदेश देणार आहेत. या चित्रपटात इरावती हर्षे, सुनील बर्वे, गिरीश कुलकर्णी, श्रीकांत यादव, उमेश जगताप यांची प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 1 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.