‘हम छत्रपती शिवाजी महाराज के स्वराज्य को सचमें लाएंगे’, पाहा ‘मणिकर्णिका’चा दमदार ट्रेलर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

कंगना रणौत अभिनित ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हिंदुस्थानी स्वातंत्र्य संग्रामातली एक तेजस्वी ज्वाला म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. झाशीचा आईप्रमाणे प्रतिपाळ करणारी प्रशासक, इंग्रजांच्या बलाढ्य सत्तेला खुलं आव्हान देणारी योद्धा, स्त्रियांचे गुण ओळखून त्यांना शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देणारी एक कणखर स्त्री, अशा अनेक रुपांमध्ये आपण आजवर राणी लक्ष्मीबाईंविषयी इतिहासात वाचत आलो आहोत. ती सर्व रुपं आपल्याला चित्रपटात पाहायला मिळतील, असा अंदाज ट्रेलरवरून येतोय.

या ट्रेलरमध्ये संवाद दमदार आहेत. विशेषतः राणींच्या तोंडचा शिवाजी महारांजाच्या स्वराज्यपूर्तीचा संवाद अंगावर रोमांच उभे करतो. हा चित्रपट राधाकृष्ण जगर्लामुडी आणि कंगना रणौत या दोघांनी दिग्दर्शित केला आहे. कंगनाखेरीज या चित्रपटात अतुल कुलकर्णी, अंकिता लोखंडे, सुरेश ऑबेरॉय, डॅनी डेंग्जोप्पा असे तगडे कलाकार आहेत. ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट 25 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित होत आहे.

पाहा या चित्रपटाचा ट्रेलर-