विहिरीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नांदगाव कोहळी येथे मंगळवारी दुपारी चारवर्षीय मुलाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. नांदगाव कोहळी येथील शेतकरी माणिक चौधरी यांचा मुलगा पियुष (4) हा मंगळवारी दुपारी शेतात खेळत असताना अचानक विहिरीत पडला. वडिलांनी त्याला पाण्याबाहेर काढून उपचारासाठी त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱयांनी तपासून मृत घोषित केले, अशी माहिती त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दिली.